Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » स्थानिक गुन्हे शाखेने घेतले अट्टल दुचाकी चोरट्यास ताब्यात !
    क्राईम

    स्थानिक गुन्हे शाखेने घेतले अट्टल दुचाकी चोरट्यास ताब्यात !

    editor deskBy editor deskMarch 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्ह्यातील अमळनेर येथून दुचाकी चोरनाऱ्या चोरट्यास जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्यास ताब्यात घेतले आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, अट्टल दुचाकी चोरट्याच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या बांधत जळगाव जिल्ह्यातील अमळनेरसह मध्यप्रदेशातील चोरलेल्या तब्बल 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. अजय अंबालाल पावरा (27, वकवड, बोराड, ता.शिरपूर, जि.धुळे) असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. अमळनेर शहरात चोरीची दुचाकी घेवून संशयित अजय पावरा हा फिरत असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पथकातील सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश मेढे, संजय हिवरकर, गोरख बागुल, कमलाकर बागुल, संदीप पाटील, संदीप साळवे, पोलीस नाईक प्रवीण मांडोळे, ईश्वर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल लोकेश माळी, अशोक पाटील यांनी कारवाई करत रविवारी अमळनेर शहरातून संशयित आरोपी अजय अंबालाल पावराच्या मुसक्या बांधल्या. आरोपीच्या सखोल चौकशीत त्याने चोरीच्या 14 दुचाकी काढून दिल्या. आरोपीला चोरीच्या दुचाकीसह अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.