Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सुट्टीवर आलेल्या जवानाचा जळगावात दुदैवी मृत्यू !
    क्राईम

    सुट्टीवर आलेल्या जवानाचा जळगावात दुदैवी मृत्यू !

    editor deskBy editor deskMarch 18, 2023Updated:March 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील सैन्य दलात नोकरीवर असलेल्या जवान सुट्टीवर घरी आलेला असतांना घरातील जीना उतरतांना अचानक चक्कर येऊन पडल्याने या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कांचन नगरात घडली आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, शहरातील शनिपेठ परिसरात वास्तव्यास असलेले विशाल भरत सैंदाणे (वय-३५) हे भारतीय सैन्य दलात आपले कर्तव्यावर होता. कांचन नगर येथे काही दिवसांपूर्वीच ते सुट्टीवर घरी आलेला होते. १५ मार्च रोजी बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घराच्या पहिला मजल्याच्या जिन्यावरून खाली उतरत असताना विशालला अचानक चक्कर आले. त्यामुळे तो जिन्यावरून खाली कोसळले. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ शेजारी राहणार्‍या तरूणांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.

    एकुलता एक मुलाचे अचानक अपघाती निधन झाल्याने आई-वडिलांवर व पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय शेलार करीत आहे. मयता जवानाच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि लहान मुलगा आणि मुलगी, बहिण असा परिवार आहे. मयत विशाल सैंदाणे यांच्यावर गुरूवार १६ मार्च रोजी दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.