Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
    क्राईम

    ‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

    editor deskBy editor deskMarch 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरात गेल्या काही महिन्यापासून चारचाकीसह दुचाकी सुसाट चोरल्या जात आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणाहून दुचाकीसह चारचाकी चोरीस जात असले तरी पोलीस प्रशासनाकडून कुठलेही कठोर पावले उचलले जात नाही. शहरातील एका परिसरातून चारचाकी चोरीस गेली होती. या प्रकारणी एमआयडीसी पोलिसांनी नुकतेच धारावी येथील एका चोरट्यास अटक केली आहे.

    शहरातील अयोध्या नगरातील बबनराव थोरवे यांची कार लांबविणाऱ्या अब्दुल रहेमान शहाबुद्दीन शेख (३७, रा.धारावी झोपडपट्टी, मुंबई) या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी नागपूर येथून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली कार हस्तगत केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.बबनराव थोरवे यांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता घरासमोर त्यांच्या मालकीची एमएच. १९. सीयू ०३५८ क्रमांकाची कार उभी केली होती. २२ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता थोरवे हे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर आल्यावर त्यांना कार दिसून आली नव्हती. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात कार चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास इमरान सैय्यद हे करीत होते. या गुन्ह्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी राज्यातील इतर पोलिसांनाही दिली होती.

    अब्दुल रहेमान शहाबुद्दीन शेख याच्याविरुध्द नागपूर येथे दोन दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय त्यांची गँगसुध्दा असून त्यांच्या मदतीने तो कार चोरी करायचा. ही गँग कार चोरण्यात माहिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, शेख याच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

    April 29, 2026

    अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

    April 29, 2026

    फैजपूर-वरणगावमध्ये गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.