Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बापाच्या हौसेला मोलच नाही ; मुलाच्या वाढदिवसाला केले बापाने
    सामाजिक

    बापाच्या हौसेला मोलच नाही ; मुलाच्या वाढदिवसाला केले बापाने

    editor deskBy editor deskMarch 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    प्रत्येक नात्याला हौसेला मोल नसतं, असं म्हणतात ते काही खोटं नाही. त्यात जर हे नातं वडील आणि मुलगा असेल तर विचारायचीच सोय नाही. याचीच प्रचिती वसईतल्या एका वाढदिवसानिमित्त आली. वसईत पूर्वे कडील कामण गावातील नवीत भोईर हे जिल्हापरिषद शाळेत शिक्षक आहेत. भोईर यांच्या लग्नाला 6 वर्ष झाल्यानंतर त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव नवीत यांनी रेयांश ठेवलं. जन्मानंतर रेयांश एक महिना आयसीयूमध्ये उपचार घेत होता. नवीत भोईर यांना मुलाचं बारसं थाटामाटात करायचं होतं, पण रेयांशच्या आजारपणामुळे त्यांना बारसं दणक्यात करता आलं नाही.

    रेयांश आजारपणातून पूर्ण बरा झाल्यानंतर नवीत यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. विशेष म्हणजे मागच्या वर्षी रेयांशच्या पाहिल्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी त्याला मुंबईहून हेलिकॉप्टमधून आणण्यात आलं होतं. रेयांश याचा शनिवारी दुसरा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त वेरना कारची प्रतिकृती असलेला चक्क 221 किलोचा केक आणला होता.
    हा केक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. एखाद्या शाही लग्न सोहळ्या प्रमाणे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून हा वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी वाढदिवसा निमित्त चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, शरीरश्रोष्ठ स्पर्धा, जादूगार तसंच लहान मुलांच्या खेळांचे आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 15 वर्षापासून नवीत भोईर सामाजिक कार्य करत आहेत, त्यांना प्रसिद्धीच्या झोतात यायचं नव्हतं मात्र या केक चा व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांना माहिती झालं. कोरोना काळात या शिक्षकाने 200 लोकांना धान्यवाटप केलं.

    दरवर्षी दहावी मध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना 7 हजार 14 ट्रॉफी भोईर देतात. शाळांच्या क्रीडा स्पर्धांसाठी 50 ट्रॉफी देतात. या वेळी ते दिव्यांगाना व्हीलचेअरचं वाटप करणार आहेत. दिव्यांगाना गर्दीचा त्रास होऊ नये, म्हणून तो कार्यक्रम स्पेशल करणार असल्याचं भोईर यांनी सांगितलं. या वाढदिवसाला राजकीय, सामाजिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा फेरबदल; 54 लाख महिला अपात्र !

    May 2, 2026

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.