Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कसब्यात कॉंग्रेसने रोखला भाजपचा रथ !
    राजकारण

    कसब्यात कॉंग्रेसने रोखला भाजपचा रथ !

    editor deskBy editor deskMarch 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    गेल्या अनेक वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा कसबा पेठ मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. धंगेकरांना ७२ हजार ५९९ तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मतं मिळाली आहेत. साधारण १० हजार ८०० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत. त्यामुळे या पोट निवडणुकीत भाजपचा रथ रोखण्यात कॉंग्रेसला यश आले आहे.

    खरंतर कसबा पेठ निवडणूक दोन्ही पक्षांसाठी रंगीत प्रतिष्ठेची झाली होती. कसबा हा भाजपला बालेकिल्ला समजला जात असला तरी पेठेतल्या मतदारांनी भाजपला नाकारलं आहे. स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कसब्यात ठाण मांडून होते. रात्री-अपरात्री त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील प्रचारादरम्यान पुणे दौऱ्यावर होते. ही निवडणूक २०२४ विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजली जाते. कसब्यातून काँग्रेसला परवलीचा मुद्दा सापडलाय का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
    स्थानिक उमेदवार आणि स्थानिक मुद्दे घेऊन कसब्याची निवडणूक झाली. शिवाय रवींद्र धंगेकर यांचं ग्राऊंड लेव्हलवरील काम, त्यांचा साधेपणा; हे मुद्दे काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या कामी आले आहेत. काँग्रेसला धंगेकरांच्या माध्यमातून विजयाचा सूर गवसू शकतो, असंही राजकीय जाणकार सांगतात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.