Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘त्या’ विधानावर संजय राऊतांनी केले कौतुक !
    राजकारण

    ‘त्या’ विधानावर संजय राऊतांनी केले कौतुक !

    editor deskBy editor deskFebruary 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    पुणे येथे सुरु असलेली पोटनिवडणुकीत सर्वच पक्षातील नेते प्रचारात लागल्याने अनेक विधान याठिकाणी होत आहे. अशातच महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे थेट ठाकरे गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांचे कौतुक केले आहे.
    ‘नारायण राणे यांना बाईन पाडलं… बाईनं’ या शब्दांमध्ये कोटी करत अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. अजित पवार यांनी शेलक्या भाषेत केलेल्या या टीकेवर भलतेच खूश झालेल्या संजय राऊत यांनी अजित दादांचे तोंडभरून कौतुक केले आहे. दादा म्हणजे कमाल की चीज आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी आपला आनंद व्यक्त केला.

    अजित पवार म्हणाले, आत्तापर्यंत शिवसेना फोडणाऱ्यांचा विजय झालेला नाही. त्यांना जनतेने जागा दाखवलेली आहे. भुजबळांसहीत सगळ्यांना पाडण्याचे काम केले. नारायण राणेंना तर दोनदा पाडले. एकदा कोकणात आणि दुसऱ्यांदा मुंबईत वांद्रत एका महिलेने पाडले. बाईने पाडले बाईने, असे म्हणत अजित पवार यांनी राणेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. ‘दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र’ असे ट्विट करत संजय राऊत यांनी अजित पवार यांची तोंडभरून स्तुती केली आहे.

    नारायण राणे यांनी आत्तापर्यंत अनेकदा संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. दोन्ही नेत्यांमधील वाद सर्वश्रुत आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत राणेंचा समाचार घेतल्याने संजय राऊत यांच्याकडून अजित पवारांचे कौतुक करण्यात आले.

    #sanjyaravut
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाढदिवसाचा अनोखा आदर्श! नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी गरजूंना रेनकोट वाटून दिला सामाजिक संदेश

    July 30, 2026

    जिल्ह्यातील ६३८ शिक्षकांचे शालार्थ आयडी मनोजच्या माध्यमातून: कोट्यवधींच्या मायाजालाचा धक्कादायक खुलासा?

    July 30, 2026

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.