Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेरात दोन गटात दगडफेक ; गुन्हा दाखल !
    अमळनेर

    अमळनेरात दोन गटात दगडफेक ; गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskFebruary 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    शहरातील भांडारकर गल्लीत गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोन गटांत दगडफेक झाली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी लागलीच पोलिस पोहचल्याने शांतता झाली.

    एका फलकावरून दोन गटांत वाद निर्माण झाले. वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने तणाव निर्माण झाला होता. दोन गटांतील काही इसम एकमेकांवर विटा, दगड फेकत असल्याने मध्ये जाण्यास कोणी धजावत नव्हते. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. पोलिसांनी जमावावर ताबा मिळवून काही मिनिटांत शांतता प्रस्थापित केली. दोन्ही गटांकडून कोणाचीच तक्रार आली नाही, म्हणून अखेर पोलिसांनी स्वतःहून दखल घेऊन पोलिस नाईक सिद्धांत शिसोदे यांनी तक्रार दिली.

    शिसोदे आणि डॉ. शरद पाटील गस्त घालत असताना वाडी चौक परिसरात दोन गटांत दगडफेक सुरू झाली होती. शांततेचा भंग केला म्हणून दोघांसह इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव वाहनाच्या धडकेत कपडे विक्रीसाठी जाताना व्यावसायिक ठार !

    December 21, 2025

    भाजप उमेदवाराकडून ठाकरे गटाच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न !

    December 20, 2025

    मालवाहू वाहनाच्या धडकेत ट्रॅक्टरवरील मजुराचा बळी

    December 20, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.