Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतकरीला लुटणाऱ्या फरार आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात !
    क्राईम

    शेतकरीला लुटणाऱ्या फरार आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskFebruary 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    दोन वर्षांपूर्वी शेतकर्‍याला लुटून फरार असलेला संशयित शाहरुख रज्जाक तडवी (वय-25, रा. कोल्हे ता. पाचोरा) हा पोलिसांना गुंगारा देत होता. तब्बल दोन वर्षानंतर त्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या.

    पाचोरा येथील शाहरुख रज्जाक तडवी याने शेतकर्‍याची घटना घडली होती. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून शाहरुख हा पोलिसांना गुंगारा देत अटक चुकवित होता. दरम्यान, संशयित शाहरुख हा पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक तयार करुन संशयिताला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. पथकाने गावात आल्याची कुणकुण लागताच संशयित शाहरुख हा पळून जात असतांना त्याच्या पथकाने चारही बाजूने घेरून मुसक्या आवळल्या. त्याला पुढील कार्यवाहीसाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक अभयसिंग देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ लक्ष्मण पाटील, रणजीत जाधव, किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख यांनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.