Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगाव तालुक्याला पुन्हा मुसळधार पावसाचा फटका
    चाळीसगाव

    चाळीसगाव तालुक्याला पुन्हा मुसळधार पावसाचा फटका

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 28, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून जळगाव जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट दिला होता सोमवारी  रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरी आणि तितूर नदीला पुर आला आहे.चाळीसगाव  शहरातील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे अलीकडेच आलेल्या महापूराच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

    याबाबत वृत्त असे की हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यातील काही भागात रेट अलर्ट जाहीर केले होते मुसळधार पाऊस होईल याची चेतावणी दिली होती सोमवारी रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार वृष्टी झाली. यामुळे तितूर आणि डोंगरी नद्यांसह परिसरातील सर्व नाल्यांना मोठा पूर आला आहे. विशेष बाब म्हणजे डोंगरी आणि तितूर या दोन्ही नद्यांना एकाच महिन्यात पाचव्यांदा पूर आलेला आहे. चाळीसगाव शहराच्या मधून जाणार्‍या नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे येथील रहदारी बंद झालेली आहे. तर काही भागांमध्ये पाणी शिरल्याची माहिती देखील समोर आली आहे.

    यापूर्वी ३० ऑगस्टच्या रात्री झालेल्या ढगफुटीमुळे चाळीसगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली होती. यानंतरही पावसाचे प्रमाण वाढतच राहिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    कन्नड घाटात एसटी बसचा थरार! स्टेअरिंग रॉड तुटला; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला

    August 23, 2026

    गिरणा धरणाचे दरवाजे आज उघडणार; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    July 31, 2026

    गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

    July 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.