Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कन्नड घाटात एसटी बसचा थरार! स्टेअरिंग रॉड तुटला; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला
    क्राईम

    कन्नड घाटात एसटी बसचा थरार! स्टेअरिंग रॉड तुटला; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला

    editor deskBy editor deskAugust 23, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसचा कन्नड घाटात स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटल्याने बसचे नियंत्रण सुटल्याची थरारक घटना रविवारी (दि. २३ ऑगस्ट) सकाळी घडली. नियंत्रण सुटलेली बस घाटातील कठड्याला अडकून थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. या बसमध्ये तब्बल ५९ प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवाशांचा जीव बचावला असून, चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस क्रमांक एमएच ४० एन ९७२६ ही छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे प्रवाशांना घेऊन जात होती. कन्नड घाटातून बस जात असताना अचानक स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस अचानक अनियंत्रित झाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, बस घाटातील कठड्याला अडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला. बस कठड्यापलीकडे जाऊन खोल दरीत कोसळली असती, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे सुदैवाने ५९ प्रवाशांचा जीव वाचला. या घटनेत चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे.

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदतकार्य करण्यात आले. या घटनेमुळे कन्नड घाट परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.  दरम्यान, एसटी बसच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटण्यामागील नेमके कारण काय, बसची यापूर्वी तांत्रिक तपासणी झाली होती का आणि वाहन रस्त्यावर सोडण्यापूर्वी आवश्यक तपासणी करण्यात आली होती का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. सुदैवाने यावेळी मोठी जीवितहानी टळली असली तरी अशा तांत्रिक त्रुटींकडे एसटी प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    थकीत भाडे भरा, नाहीतर गाळे सील! गोलाणी मार्केटमध्ये आयुक्तांचा कडक इशारा

    August 23, 2026

    २३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून संपविले आयुष्य !

    August 23, 2026

    २० फूट उंचीवरून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू!

    August 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.