Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आजचे राशिभविष्य दि २७ जानेवरी २०२३
    राज्य

    आजचे राशिभविष्य दि २७ जानेवरी २०२३

    editor deskBy editor deskJanuary 27, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मेष:- जवळचा प्रवास गरजेचा असेल तरच करावा. नवीन मित्र जोडले जातील. काही क्षणिक आनंदाच्या गोष्टी घडतील. ओळखीतून कामे पार पडतील. दिवस आळसात जाईल.

    वृषभ:- ऐषारामाच्या वस्तू खरेदी कराल. मानसिक समाधान शोधाल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. कामात स्त्रियांची उत्तम साथ लाभेल. मित्रमंडळी जमवाल.

    मिथुन:- जोडीदाराशी मतभेद संभवतात. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्याल. कलेला विशेष प्राविण्य मिळेल. कामाची चोख पावती मिळेल.

    कर्क:- दिवस चांगल्या संगतीत जाईल. वडीलधार्‍यांची उत्तम मदत मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. मुलांचे विचार विरोधी वाटू शकतात. नातेवाईकांच्या समस्या जाणून घ्याल.

    सिंह:- खेळात मन रमून जाईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. विरोधकांच्या कारवाया मावळतील. कामाचे समाधान लाभेल.

    कन्या :- पत्नीची उत्तम साथ लाभेल. भागीदारीत चांगला लाभ होईल. तुमच्या संपर्कातील लोकात वाढ होईल. मुलांशी क्षुल्लक कारणावरून वाद संभवतो. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवाल.

    तूळ:- भावंडांशी मतभेद संभवतात. हातात नवीन अधिकार येतील. कामातील ऊर्जा वाढेल. घरात नातेवाईक गोळा होतील. मानसिक स्वास्थ जपावे लागेल.

    वृश्चिक:- काही किरकोळ कौटुंबिक प्रश्न सोडवावे लागतील. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करा. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. आप्तेष्टांशी मतभेद संभवतात.

    धनू:- दिवस धावपळीचा राहील. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. क्षुल्लक गोष्टीवरून वाद संभवतात. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.

    मकर:- मनातील निराशा दूर सारावी. कुटुंबात काही बदल घडून येतील. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. आर्थिक ताण वाढू शकतो. फसवणुकीपासून सावध राहावे.

    कुंभ:- कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. कामाचा ताण जाणवेल. कौटुंबिक प्रगतीकडे लक्ष द्यावे. आवडते पदार्थ खायला मिळतील. इतरांवर आपली उत्तम छाप पडाल.

    मीन:- हौस पूर्ण कराल. प्रत्येक गोष्टीत आनंदाने रस घ्याल. सर्वांशी गोडीने वागाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.