Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरूणाची गळफास घेवून आत्महत्या
    क्राईम

    तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 24, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आसोदा येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याने दारूच्या नशेत राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घडली घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    जळगाव तालुक्यातील आसोदा येथील रहिवाशी शेतकरी रमेश अशोक पाटील (वय-३६) आपल्या पत्नी व दोन मुलीसह राहतात. शेतीकाम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. २३ सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी ह्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. तर दोन्ही मुली कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी ७ वाजेच्या पुर्वी रमेश पाटील यांनी राहत्या घरातील पुढच्या खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी सायंकाळी शेतातून घरी आल्या त्यावेळी हा प्रकार समोर आला. त्यांचा मृतदेह खाली उतरवून तातडीने जिल्हा रूग्णालयाने नेण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोळे यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण आगोणे करीत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो’ : वाढदिवसाला न बोलविल्याने संपविले आयुष्य !

    April 9, 2026

    धक्कादायक! शाळेबाहेरील गैरकृत्यांमुळे ‘त्या’ शिक्षकावर गाजले निलंबन !

    April 9, 2026

    पाहुणी बनून घरात शिरली, विश्वासघात करून दागिने लंपास; ९७ हजारांची चोरी !

    April 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.