जळगाव : प्रतिनिधी
वारकरी संप्रदायाशी आपली पहिल्यापासून नाळ जुडलेली असून या माध्यमातून आपल्याला कायम उर्जा मिळत असते. वारकरी तत्वज्ञान हे खर्या अर्थाने समाजाला दिशादर्शक असून नवतरुणांनी आपले जीवन समृद्ध आणि निर्व्यसनी करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार अंगी बनायला हवे. आज समाजात मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण होत असतांन, वारकरी संप्रदायाचा विचार हाच समाजाला तारू शकतो असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी मा.ना. गुलाबरावजी पाटील यांनी सप्ताह समारोप प्रसंगी सप्ताहाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून देव, देश आणि धर्माच्या कार्यासाठी आपण सदैव तत्पर राहू असे आश्वासित केले.* पाळधी येथील सप्ताहाची सांगता आज ह. भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज पाळधी येथील श्रीमद भागवत सप्ताहत काल्याच्या कीर्तनात दहीहंडी फोडण्यात आली. या सप्ताहात ७ दिवस महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले होते.
आज कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिसरात भगव्या पताका लावण्यात आल्याने अतिशय प्रसन्न वातावरण निर्मित झाले होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रूख्मीणीसह सर्व संतांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, नगरसेवक मनोज चौधरी, जळगाव शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा, तसेच महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध कीर्तनकार ईश्वर महाराज पाळधीकर, ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, कार्यक्रमाचे आयोजक बाविस्कर ( माळी ) परिवार , पाळधी पंच क्रोशीतील सर्व वारकरी व भजनी मंडळी उपस्थित होते. बाविस्कर परिवाराचे बापू माळी सुरेश माळी, पंकज माळी, दीपक माळी, गोपी माळी यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.