जळगाव : प्रतिनिधी
जय गजानन सत्संग जळगांव आयोजित जळगाव ते शेगांव पदयात्रा (पायी दिंडी) सोहळा पालखीसह दिनांक १ जानेवारी २०२३ ते ६ जानेवारी २०२३ पर्यंत सर्व गजानन भक्त व जळगावकराना कळवताना आनंद होतो की, पालखी सोहळ्याचे वर्ष १२ वे वर्षा नविन सामाजिक उपक्रम घेऊन पालखी निघते..
प्रत्येक वर्षाच्या पहिल्या रविवारी पालखी शेगांव प्रस्थान करते. जवळ-जवळ 200 भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होतात ते समाजा प्रति काही देणे लगते फक्त पायी चालता प्रत्येक गांवात स्वच्छता अभियान, झाडे लावा झाडे जगवा मिशन, बेटी बचाव बेटी पढाव नारा दिला जातो तर आरोग्याविषयी माहीती चांगले सुविचार संदेश देत पुढे नशिराबाद, बोदवड, मलकापूर मार्ग नादुरा खामगांव व शेगांव जाते. तसेच या सर्व उपक्रमांसाठी पालखीचे सेवेकरी सर्वांचे सहकार्य लाभते. पाठवीचे कार्यकारी मंडळ गजेंद्र (चिंटू भाऊ) मराठे, संदीप भामरे, पी.जे.पाटील, बापु मराठे, भगवान मराठे, युवरात पाटील, गुलाबराव पाटील, तुषार बोरसे, संजय पवार, नंदकुमार उदार, एस.आर.पाटील, रवी सानप, यतीन पाटील, अमोल माळी, रामचंद्र माळी यांचे अनमोल सहकार्य लाभते.