नागपूर : वृत्तसंस्था
नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात याबाबत लक्षवेधी मांडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे त्यांच्या विरोधात आता एसआयटी चौकशीचे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब विखे यांनी दिले आहे.
मंदाकिनी खडसे यांनी मुक्ताईनगर येथील गौण खनिजामध्ये राज्य सरकारचा ४०० कोटीचा महसूल बुडवला आहे, असा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या जळगाव दूध संघ निवडणुकीत मंदाकिनी खडसे यांचा पराभव झाला आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नीचा मोठा पराभव झाल्याने दूध संघावरील पकड आता कमी झाल्याचे बोलले जात आहे. भाजपेचे नेते गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांचा विजय असल्याचे सांगितले जात आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ बरखास्त करण्यापूर्वी मंदाकिनी खडसे या संघाच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळे खडसे गटाला हा झटका मानला जात आहे.
भाजपेचे नेते गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांचा विजय असल्याचे सांगितले जात आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ बरखास्त करण्यापूर्वी मंदाकिनी खडसे या संघाच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळे खडसे गटाला हा झटका मानला जात आहे. भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मंदाकिनी खडसे यांचा तब्बल 76 मतांनी पराभव केला आहे. दूध संघाच्या निवडणुकीत आमदार चव्हाण यांना 255 ते मिळाली आहेत, तर मंदाकिनी खडसे यांना 179 मते मिळाली आहेत. त्यामुळे खडसे यांच्यावर पराभवाची नामुष्की आली आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत खडसे यांचा गृहतालुका असलेला मुक्ताईनगरमधून मंदाकिनी खडसे यांना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आव्हान दिले होते.