मुंबई : वृत्तसंस्था
कच्च्या तेलाच्या दरांत सातत्यानं चढ-उतार होत असूनही देशातील पेट्रोल-डिझेल मात्र स्वस्त होण्याची चिन्हं दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज कच्चं तेल 80 डॉलरच्या खाली आहे आणि भारतातही चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत 80 डॉलर्सच्या खाली आहे. आज ते प्रति बॅरल 79.72 डॉलर्सच्या दरावर आहे. याशिवाय, डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत प्रति बॅरल 74.90 डॉलर आहे आणि अशा स्थितीत ती केवळ 75 डॉलरच्या खाली आहे.
दररोज सकाळी जारी होतात नवे दर
भारतातील सरकारी तेल कंपन्या भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. आज चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेल जुन्या दराने विकले जात आहे. जाणून घेऊया नवीन दरांबद्दल…
देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
राज्यात कोणत्या शहरात किती दर?
नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर