Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » किसान मोर्चा ने केंद्राचे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी
    जळगाव

    किसान मोर्चा ने केंद्राचे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 16, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र : केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांना रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज येथे किसान मोर्चातर्फे धरणगाव शहरातून रॅली काढून याच्या विरोधात निवेदन देण्यात आले.

    याबाबत वृत्त असे की, आज किसान मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी धरणगाव शहरातून मोर्चा काढला. यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबत शेतकर्‍यांच्या कृषी उत्पादनांना किमान हमी रक्कम इतका भाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणावे, देशभरातील निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर टाळून आधीप्रमाणेत मतपत्रिकेने निवडणुका घेण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

    याप्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख, तालुकाध्यक्ष बाळू चौधरी, वाल्मीक पाटील, आबासाहेब वाघ, प्रमोद पाटील, जितेंद्र चौधरी, निंबा कुंभार, श्रीकांत पाटील, गौतम गाजरे, निलेश पवार, शरद पाटील, दीपक मराठे, अरविंद चौधरी, गोपाळ चौधरी, अरूण पाटील, वाल्मीक पाटील, भागवत चौधरी, महेंद्र भोई, रामचंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

    February 13, 2026

    ऑनलाइन लोन अॅपचा कहर; वैयक्तिक माहितीचा गैरवापर

    February 13, 2026

    दिवसाढवळ्या १३ वर्षीय मुलावर चाकूहल्ल्याने खळबळ !

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.