जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी व इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न झालेल्या रोजगार मेळाव्यात एकूण 460 तरुणांनी आपली नोंदणी करून उपस्थिती दिली.
यावेळी काही नामांकीत कंपनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष मुलाखती पार पडल्या यामध्ये एकूण 232 तरुणांचे सिलेक्शन करून त्यांना लगेच ऑफर लेटर देण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंदभैय्या पाटील,कार्याध्यक्ष विलास पाटील,महानगरअध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाज मलिक,ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील,जिल्हा समन्वयक विकास पवार,महिला महानगराध्यक्षा सौ.मंगला पाटील,ग्रंथालय सेल समन्वयक सौ.रिटा बाविस्कर,युवक अध्यक्ष रिकू चौधरी,सेवादल जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन सर,सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी,युवती अध्यक्षा अभिलाषा रोकडे,दीपिका भामरे,रविदादा पाटील,धनराज माळी,ऍड.राजेश गोयर तसेच नॉलेज सिटीचे उपाध्यक्ष श्री विलास नायर यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दुर्गेश परदेशी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.एस पी अहिररराव,प्रा.पी आर पाटील व प्रा.वाय.आर.पाटील यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले व नॉलेज सिटी चे अध्यक्ष श्री आर.व्ही पाटील यांनी केले होते.