Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवार्डचेे वितरण
    जळगाव

    रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवार्डचेे वितरण

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 8, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या 9 ‘शिक्षकांना नेशन बिल्डर अ‍ॅवार्ड‘ प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले.
    गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यास प्रांतपाल रमेश मेहेर, माजी प्रांतपाल राजीव शर्मा, अध्यक्ष उमंग मेहता, माजी मानद सचिव सुनील आडवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
    सोहळ्यात सुचिता बाविस्कर (मनपा शा.क्र.38 जळगाव), सुनीता शिमाले (क्रिडा रसिक सोसा.संचालित प्राथ.शाळा), जयश्री पाटील (चांदसरकर प्राथ.शाळा), अनिल शितोळे (नुतन मराठा माध्य. विद्यालय), किरण चौधरी (भगीरथ माध्य.विद्यालय), नरेंद्र वारके (क.रा.वाणी बाल निकेतन), मनोहर तेजवाणी (आदर्श सिंधी माध्य. विद्यालय), सागर झांबरे (शारदा प्राथ.शाळा सुप्रीम कॉलनी), राजेंद्र साहेबराव पाटील (शिक्षण शास्त्र विद्यालय, नूतन कॉलेज प्रांगण) आदि नऊ शिक्षकांना पुरस्कार, शाल, श्रीफळ प्रदान करुन कुटुंबीयासह सन्मानित करण्यात आले.
    रोटरी गोल्डसिटीतर्फे पुरस्कारासाठी शिक्षकांकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता समाज माध्यम, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया तसेच पालकांकडून आलेल्या प्रतिसाद यावर सत्कारार्थी शिक्षकांची निवड करण्यात आली. यावेळी प्रांतपाल मेहेर आणि राजीव शर्मा यांनी मार्गदर्शन केले. सूत्र संचालन अशोक सौंदाणे यांनी तर परिचय चंदर तेजवानी यांनी करुन दिली. आभार नंदू आडवाणी यांनी मानले.
    यशस्वीतेसाठी गोल्डसिटीचे प्रोग्रॅम कमेटी चेअरमन यश रावलानी, लिट्रसी कमेटी चेअरमन दिनेश राठी, व्होकेशनल कमेटी चेअरमन माजी अध्यक्ष प्रखर मेहता, माजी अध्यक्ष निलेश जैन आदिंसह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बारामती विमान दुर्घटनेला घातपाताचा रंग? पिंकी माळींच्या वडिलांचा खळबळजनक दावा

    February 11, 2026

    पैशांच्या कारणावरून भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला

    February 11, 2026

    पैशांच्या वादातून भावावर लोखंडी पाईपने हल्ला

    February 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.