जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूना सिनेट निवडणुकीमधील चुकीच्या नियुक्त्या थांबवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.जिल्हाअध्यक्ष कुणाल बी पवार यांनी मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, आपल्या विद्यापीठात काय प्रकार सुरू आहे तो आम्हाला कायदा मानणाऱ्या व्यक्तींना समजण्याच्या पलीकडे दिसत आहे. कारण निवडणूक जाहीर झाल्यापासून ह्यात वेगवेगळे बदल सतत होताना दिसत आहे त्यामागे नेमका कोणाचा दबाव आपल्यावर आहे हे आपण जाहीर कराल का? त्यामुळे आम्हास काही प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरे आपण आम्हाला न देता पत्रकार बंधू जे लोकशाहीचे चौथे स्तंभ मानले जातात त्यांच्या मार्फत दिली तर फार अज्ञान दूर होण्यास सर्वांना मदत होईल .तरी आपण पुढील प्रश्नाची उत्तरे द्याच…
१) आपल्या उमवी मध्ये सिनेट निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती पहिले केली ?
२) त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जुलै महिन्यात किती नोटिफिकेशन काढले?
३) त्या निवडणूक निर्णय अधिकारी ह्यांनी वेळोवेळी फॉर्म भरण्यास मुदत वाढ कोणाच्या परवानगीने दिली?
४) मागील काळात झालेले बोगस नोंदणी सुमारे १६०००/_मतदानाला आम्ही आक्षेप घेतला कारण सन १९९४ नंतर चां विद्यार्थी आपल्या विद्यापीठात एनरोल होत नाहीं कारण कलम १३१ विद्यापीठ कायदा मधील तरतुदी काय आहेत? त्या मतदारांचे आधारकार्ड पदवी प्रमाणपत्र मागितले ते आपल्या विद्यापीठात उपलब्ध आहेत का? त्याचे रेकॉर्ड आपल्या विद्यापीठात उपलब्ध आहेत का असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर लगेच निवडणूक निर्णय अधिकारी ह्यांनी राजीनामा का दिला?
५) तसेच मागील वर्षीच्या निवडणुकीतील पदवीधर नोंदणी पुस्तिका व एनरोल रजिस्टर आपल्याकडे असेल तर ते सर्वांच्या अवलोकानासाठी उपलब्ध करून द्यावे त्याची कायदेशीर फी भरण्यास आम्ही तयार आहोत.
६) ती पुस्तिका आढळून आली नाही किवां एलेक्टरोल रजि. आढळून न आल्यास मागील निवडणूक रद्द होऊ शकते का ?
७) नवीन होणाऱ्या मतदार मध्ये सन २०१४ पर्यंतचे मतदार नोंदणी करू शकतात परंतु आपल्या विद्यापीठात सन २००७ पासून नोंदणी कशी केली गेली आहे ह्याचे उत्तर निवडणूक अधिकारी ह्यांना विचारून द्याल का ?
८) जुलै महिन्यापासून प्रतेक वेळेस नोंदणी अर्जात बदल केले गेले तसे बदल करता येतात का ? कारण पहिल्या व शेटच्या नोंदणी अर्जात बदल झाले असल्याने नोंदणी मध्ये पारदर्शकता राहिलेली दिसत नाही ह्याचे कारण आपण सांगू शकतात का ?
९)निवडणूक शाखेतून आतापर्यंत किती अधिकारी ह्यांनी राजीनामा दिले व का दिले ह्याबाबत सत्यता सर्वांना सांगाल का ?
१०) विद्यापीठ कायद्यानुसार कलम १४ नुसार कुलसचिव हे निवडणूक निर्णय अधिकारी असताना उपअभियंता ह्यांना निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्याचे कारण काय ? त्यासाठी आपल्याला कोणाचा दबाव आहे का ? सदर पद कोणतीही व्यक्ती जिला व्यवस्थापनाचा अनुभव नसेल त्याला पण देता येते का ?
तसेच कुलगुरू साहेब विद्यापीठ कायदा व पीपल्स रीप्रेझेंत ॲक्ट नुसार निवडणुकीची आदर्श सहिता प्रमाणे कुलगुरू साहेब तुम्ही वर्तमान पत्रात सांगितल्या प्रमाणे समिती नेमण्याची तरतूद कायद्यात आमच्या माहिती प्रमाणे नाही ती आपण कोणाच्या सांगण्यावरून जाहीर केली त्याचे अवलोकन आम्हास करून द्याल का ? आपणास कळकळीची विनंती की आपल्यावर कोणाचा दबाव आहे? कोण आपल्याला असे नियम सोडून वागण्यास भाग पाडत आहे ह्यासाऱ्या प्रश्नाची उत्तरे आम्हास तत्काळ द्यावी तसेच आपण निवडणूक विषयी मतदारांची कोणतीही यादी प्रसिद्ध करत असाल तर त्यावर सर्वाचा आक्षेप नसल्या नंतरच जाहीर करावी जेणे करून कोणावर अन्याय होणार नाही असे काही चुकीचे झाल्यास त्यास विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील व त्याविरुद्ध आम्ही योग्य त्या न्यायालयात दाद मागू व आमच्या शैलीने आंदोलन करू त्यामुळे आमच्या साध्या सरळ प्रश्नाची उत्तरे तत्काळ द्यावी अन्यथा आम्हास विद्यापीठात येवून त्याबाबत विचारणा करावी लागेल. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष भुषण भदाने, रावेर लोकसभा अध्यक्ष गौरव वाणी, गणेश निंबाळकर, राहुल पाटील, राहुल जोशी यांची उपस्थिती होती.