सीआयएसएफमध्ये जवळपास 10 वर्षांच्या सेवेनंतर केरळमधील दोन श्वान निवृत्त झाले आहेत. दोघांनाही कोची विमानतळावर जवानांनी निरोप दिला. या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित एक व्हिडीओही समोर आला आहे. अधिकारी या दोन कुत्र्यांना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय दोन्ही श्वानांनाही पदके देण्यात आली आहेत. यावेळी सीआयएसएफच्या जवानांसह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
#WATCH केरल: करीब 10 साल की मेधावी सेवा के बाद सेवानिवृत्त हुए CISF के दो कुत्तों को कोच्चि हवाईअड्डे पर CISF के जवानों ने विदाई दी। (02.11) pic.twitter.com/v7myfOQZ2L
— ANI_HindiNews (@AHindinews) November 3, 2022
निवृत्त झालेल्या कुत्र्यांपैकी एक 10 वर्षांचा लॅब्राडोर कुत्र्याचे नाव स्पार्की आहे. तर दुसऱ्या कुत्रा 11 वर्षांचा कॉकर स्पॅनियल इव्हान आहे. या श्वानांचा त्यांच्या सेवेच्या निमित्ताने पदक देऊन गौरव केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पारंपारिक ‘पुलिंग आउट’ समारंभात त्यांचा समावेश करण्यात आला होता जेथे CISF अधिकारी आणि जवानांनी कुत्र्यांना सजवलेल्या जीपमध्ये नेले आणि रेड कार्पेटवर फिरले. यावेळी सीआयएसएफच्या जवानांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.
रुबी आणि ज्युली या दोन नवीन श्वानांची ओळख झाली. रांचीच्या डॉग ट्रेनिंग स्कूलमधून सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून ते लष्करात दाखल झाले आहे. त्यांनाही स्टेजवर बोलावून ओळख करून देण्यात आली. भारतीय लष्कराकडून मिळालेल्या दोन श्वानांसह 14 जून 2007 रोजी CIAL एव्हिएशन सिक्युरिटी ग्रुपमध्ये श्वान पथकाचा समावेश करण्यात आला. सध्या नऊ श्वान वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ड्युटीवर आहेत.