• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यात आज सूर्यग्रहण पण मोजक्या जिल्ह्यात दिसणार !

editor desk by editor desk
October 25, 2022
in जळगाव, राष्ट्रीय, सामाजिक
0
राज्यात आज सूर्यग्रहण पण मोजक्या जिल्ह्यात दिसणार !

मुंबई : वृत्तसंस्था

आकाशात दिवाळीनिमित्त फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली. तर आज आकाशात सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळणार आहे. दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे, पण काही मोजक्या जिल्ह्याला संपूर्ण सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. अशी माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.

मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. औरंगाबाद येथून सायंकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी वाजता सूर्यग्रहणास स्पर्श होईल या विषयी बोलताना श्रीनिवास औंधकर म्हणाले की, आश्विन अमावास्या मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. ते भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून पहायला मिळणार आहे. तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात सायंकाळी सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. औरंगाबाद येथून सायंकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी वाजता सूर्यग्रहणास स्पर्श होईल. ग्रहण मध्य सायंकाळी 5 वाजून 42 मिनिटांनी होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36 टक्के भाग झाकून टाकील. पश्चिम आकाशात सूर्यास्तावेळी हे सुंदर दृश्य पाहता येईल. नंतर ग्रहण सुटण्याआधीच सायंकाळी 6 वाजून 09 मिनिटांनी सूर्यास्त होईल. ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसणार आहे. तर मराठवाड्यात ग्रहण ग्रसण्याची टक्केवारी ही सर्वात कमी उस्मानाबाद येथे 33 टक्के तर, सर्वात जास्त जालना येथे 37 टक्के असणार आहे. सूर्यग्रहण हे साध्या डोळ्यांनी पाहिल्यास दृष्टीस इजा होते. त्यामुळे सूर्यग्रहण हे ग्रहण चष्म्यातूनच पाहावे किंवा चाळणीतून सूर्याची प्रतिमा कागदावर घेऊन त्यामध्ये पाहावे असेही श्रीनिवास औंधकर म्हणाले. तर या सूर्यग्रहणानंतर 14 दिवसांनी मंगळवारी 8 नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहणही भारतातून दिसणार आहे. त्या दिवशी ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार असल्याचं देखील औंधकर म्हणाले.

Previous Post

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next Post

दिवाळीच्या दिवशी कर्तव्य बजावीत असतांना दोघांचा मृत्यू

Next Post
दिवाळीच्या दिवशी कर्तव्य बजावीत असतांना दोघांचा मृत्यू

दिवाळीच्या दिवशी कर्तव्य बजावीत असतांना दोघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group