Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रशिक्षण  केंद्राच्या नावाखाली  महिलेची ९४ लाखात फसवणूक
    क्राईम

    प्रशिक्षण  केंद्राच्या नावाखाली  महिलेची ९४ लाखात फसवणूक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 5, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी : येथील एका व्यवसायिक महिलेला निती आयोगाचे बनावट कागदपत्रे दाखवून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या नावाखाली  ९४ लाख १४ हजार ८५३ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


    सविस्तर माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा भागातील दांडेकर नगरात खासगी व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणारी योगीता उमेश मालवी (वय-३८)  ही महिला राहते. व्यवसाय करत असल्याने त्यांची अविनाश अर्जून कडमकर रा. देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांच्याशी डिसेंबर २०१८ मध्ये ओळख झाली. कडमकर यांनी योगीत मालवी यांना निती आयोगाचे बनावट कागदपत्र दाखवून व बनावट नोंदणी प्रमाणपत्र दाखविले. प्रशिक्षण केंद्र चालविण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार मालवी यांना बनावट खाते क्रमांक पाठविले. अविनाश अर्जून कडमकर, प्रिती विनायक खवले, प्रमिला अर्जून कडमकर, कांचन दादाभाऊ दंगे, शिवराम आप्पाजी जासूद, संगिता शिवराम जासूद, अर्जून माधवराव सर्व रा. देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांनी प्रशिक्षण केंद्र चालविण्याचे आमिष दाखवून योगीता मालवी यांच्याकडून वेळोवेळी १५ जानेवारीपर्यंत बनावट खात्यावर सुमारे ९४ लाख १४ हजार ८५३ रूपये मागवून घेतले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर योगीत मालवी यांनी शनिवारी ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात वरील सात जणांसह इतर अनोळखी ३ जण असे एकुण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संदीप पाटील करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.