Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ईडी ,सीबीआयचा केंद्राकडून गैरवापर — ना जयंत पाटील
    चाळीसगाव

    ईडी ,सीबीआयचा केंद्राकडून गैरवापर — ना जयंत पाटील

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 4, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र: केंद्र सरकार व सीबीआय च्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे कोणतीही चूक नसताना त्यांच्यामागे व त्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करीत आहे हा त्यातीलच एक भाग आह. विरोधकांवर दबाव तंत्र निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा वापर करीत आहे. एकनाथराव खडसे याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. असे प्रतिपादन चाळीसगाव येथे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आले असता  पत्रकारांशी बोलताना  सांगितले .

    चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव  तालुक्यात  ३० व ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे  ३८ गावांना जबर फटका बसला आहे. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. तर कन्नड घाटातील वाहतूक अजून देखील सुरळीत झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून पंचनामे योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना नामदार जयंत पाटील यांनी दिले आहेत
    जळगाव शहरातील नदी मध्ये अतिक्रमण व सुशोभीकरणाच्या नावाखाली जे अतिरिक्त बांधकाम झाले आहे ते काढण्याचे आदेश नामदार जयंत पाटील यांनी दिले असून गावात व शहरात नदीकाठावर संरक्षण भिंती बांधण्याचे आदेशित यांनी दिले आहे
    यावेळी  पाहणी करण्याआधी पत्रकारांशी बोलतांना ना. जयंत पाटील म्हणाले की, ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ईडी या देशात विरुद्ध बाजूने सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. जाचक त्रास देण्याचा प्रयत्न   केंद्राच्या या एजन्सी करत आहेत हे जगजाहीर आहे. कोणाची चूक नुसताना बदनाम केलं जात आहे. हा विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे, असं पाटील यांनी सांगितलं.  जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावर केलेल्या भाष्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमची भूमिका हीच की महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था होण्याच्या आधी ओबीसींचा प्रश्न सुटला पाहिजे. आमची बैठक झाली आहे. त्यामुळे वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच१२ सदस्यांच्या नियुक्तीचा राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. राज्यपाल लवकर निर्णय घेत नसल्याने लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    कर्जमाफीची मोठी घोषणा, पण शेतकरी नाराज; सरकारच्या निर्णयावर टीकेची झोड

    March 6, 2026

    अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंत कर्जमाफी आणि बरेच काही !

    March 6, 2026

    मैं डंडा लेके बैठा हूँ! गडकरींचा पेट्रोलियम लॉबीवर थेट इशारा

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.