सोनवद परिसरात लम्पी आजाराने चार गुरांचा मृत्यू
लाईव्ह महाराष्ट्र : धरणगाव तालुक्यातील अहिरे बु येथील एका शेतकऱ्याच्या एक बैलास लम्पी आजाराने काल दुपारी त्याचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे सुमारे ५० हजारांचे जवळ पास नुकसान झाले आहे. बैल दगावल्याची डॉ. जगताप व पशुधन विकास अधिकाऱ्यांना देण्य आली.
शेतकरी पांडुरंग नागो पाटील हे शेतात दोघं बैलांना गेल्या पाच दिवसापासून लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत होता. त्यातील एक बैलाचा आज मृत्यू झाला असून दुसरा बैल सुद्धा गंभीर अवस्थेत आहे. अहिरे बु आणि सोनवद परिसरात लम्पी आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांना लस द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच गावात मोकाट गुरे सोडू नये, असे देखील प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, एकीन हंगामात बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान झाले आहे. दुसरीकडे लम्पी रोग संसर्गजन्य असल्याने पशुपालकांनी बाधित जनावराला वेगळे ठेवावे. गोठ्याची स्वच्छता, जनावरांची स्वच्छता ठेवावी. आवश्यक त्या फवारण्या कराव्यात असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.