जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा पोलीस दल व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मानाचा असा जय गणराया पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. उत्कृष्ट आरास व शिष्टबद्ध विसर्जन मिरवणूकीसाठी उपरोक्त पुरस्कार देण्यात येत असतो. यावर्षीचा उत्कृष्ट आराससाठी जळगाव जिल्हा पोलीस दल व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा मानाचे तृतीय पारीतोषीक जय गणराया पुरस्कार 2022 युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांना देण्यात आला. सदर पुरस्कार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, सहा.पोलीस अधिक्षक (गृह) संदिप गावित, यांच्या शुभहस्ते तसेच सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, किशोर भोसले, अमित भाटीया, मुंकुंद मेटकर, दीपक जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रितम शिंदे, सचिव सौरभ कुळकर्णी, अमित जगताप, पियुष हसवाल, राहूल चव्हाण, अल्फैज पटेल, रोहीत भामरे, सयाजी जाधव, सागर सोनवणे, तेजस श्रीश्रीमाळ, भूषण सोनवणे, आयुष कस्तुरे, हर्षल तेली, जयेश पवार, दीक्षांत जाधव आदि युवाशक्ती फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
1857 ते 1947 दरम्यानचा भारतीय स्वातंत्र्य लढा या विषयावर युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे आरास काव्यरत्नावली चौक जळगाव येथे गणेशोत्सवादरम्यान आरास साकारण्यात आली होती. गणेशोत्सवाचे हे 14 वर्ष होते. विसर्जनाच्या दिवशी मंडळातर्फे 4284 घरगुती श्रींच्या मुर्तीचे संकलन करून विधीवत विसर्जन करण्यात आले होते.