जळगाव प्रतिनिधी:- कोरून रुग्णाची संख्या राज्यात कमी झाली असली तरी राज्य सरकार सण साजरे करण्यासाठी परवानगी देत नाही आहे याचा निषेध व्यक्त करीत आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कोर्ट चौकात बालगोपालांच्याहस्ते दहिहंडी फोडण्यात आली.
सविस्तर असे की, महाराष्ट्रात कोरोनाचे संकट संपल्यावरसुध्दा महाराष्ट्रातील आघाडी सरकार हिंदू सणांना परवानगी देत नाही व इतर पक्षांच्या हजारोंच्यावर कार्यकर्ते रस्त्यांवर आंदोलन करतात परंतु हिंदूचा सण असलेला दहिहंडी साजरी करण्यासाठी परवानगी देत नसल्याने जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम, मनसे तालुकाध्यक्ष मुकूंद रोटे यांच्या नेतृत्वात खाली सरकारच्या निषेधाची दहिहंडी स्मित चौधरी, हर्षल निकम आणि तेजस रोटे या बालगोपालांनी आज मंगळवार ३१ ऑगस्ट रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक अर्थात कोर्ट चौकात मोठ्या उत्साहात साजरी केली.
याप्रसंगी संदीप महाले, योगेश पाटील, पंकज चौधरी, तुषार पाठक, राहूल माळी, कुणाल पाटील, कुणाल पवार, धनजंजय चौधरी, महेश माळी, आशिष सपकाळे, गोरख जाधव, लोकेश अहिरे, संतोष सुरवाडे, विशाल कुमावत, अविनाश जोशी, नाना वानखेडे, जितु बऱ्हाटे, अमोल माळी, सागर पाटील, हर्षल निकम, महेश सोनवणे, मनोज खुळे, स्वप्निल चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.