Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लागा तयारीला : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
    चाळीसगाव

    लागा तयारीला : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

    editor deskBy editor deskSeptember 7, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमधील 1166 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
    या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी 14 ऑक्टोबर रोजी पार पडणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर या निवडणुका होणार असल्याने सगळेच राजकीय पक्ष जोर लावणार आहे. त्यामुळे या निवडणुका मोठ्या रंगतदार होणार असल्याचा अंदाज आहे.

    निवडणूक कार्यक्रम काय?
    13 सप्टेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे 24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल.

    कोणत्या जिल्ह्यांत किती ठिकाणी निवडणूक?
    ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79. पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70. रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1. रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10. सिंधुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवडगड- 2. नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71. नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81. पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1. सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6. कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1. अमरावती: चिखलदरा- 1. वाशीम: वाशीम- 1. नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8. वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7. चंद्रपूर: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1. भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1. गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2. गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1. एकूण- 1,166.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २४२ बक्षिसांची कमाई; राष्ट्रपती सन्मानाने गौरवले संजय शेलार

    January 25, 2026

    गावकुसाबाहेर डिजिटल पाऊल; पंचायतींसाठी ‘पंचम’ चॅटबॉट लाँच

    January 25, 2026

    पद्मश्री जाहीर: महाराष्ट्राच्या भूमीतील कर्तृत्वाचा राष्ट्रीय सन्मान

    January 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.