जळगाव प्रतिनिधी: शिक्षण संस्थेमध्ये असो इतर कुठल्याही संस्थेमध्ये उणीवा निश्चीत आहेत, एक दोन शिक्षक वाईट काम करतो, म्हणून सर्वच शिक्षक वाईट काम करतात असं नाही, शिक्षक हा देशाचा आधार आहे, तो मार्गदर्शक आहेत, त्याच्याबाबत कुणीही चुकीचं बोललेल नाही अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षक पुरस्कार सोहळ्यात सोमवारी ५ सप्टेंबर रोजी बोलतांना व्यक्त केली आहे.
काही आमदारांनी आज जळगावातील एका कार्यक्रमात भाषण करतांना आजच्या शिक्षण व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले. आमदारांनी व्यक्तीगत कुणावरही टीका केलेली नाही. काही ठिकाणी चुकीचं काम होत, असे आमदारांनी भाषणात म्हटलंय… एक ते दोन शिक्षक वाईट काम करतात म्हणून सर्वच शिक्षक वाईट असतात असे नाही, शिक्षक हा देशाचा आधार तसेच मार्गदर्शक असल्याने कुणीही चुकीचं बोललेल नसल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं.
भाजपचे नेते अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहे, यावर विचारले असता, मंत्री पाटील म्हणाले की, अमित शहा हे दरवेळी गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईला येत असतात जर ते मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत असतील तर ती बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारात आहे, त्यामुळे तेच त्यावर बोलू शकतील असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.