जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वसंतवाडी येथे आदर्श गणेश मित्र मंडळ यांनी सार्वजनिक गणपतीजींची स्थापना केली आहे व या गणेश उत्सवानिमित्त आदर्श मित्र मंडळाच्या नव युवकांनी स्तुत्य उपक्रम रेड प्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतला आहे व यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. दि ५ रोजी आज सायंकाळी ५:००वाजता रक्तदान शिबिर वसंतवाडी येथे ठेवले आहे तरी जास्तीत जास्त रक्तदान करुन सहकार्य करण्याचे आवाहन आदर्श गणेश मित्र मंडळ यांनी केले आहे .
यात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांनसाठी रेड प्लस ब्लड बँक यांच्या तर्फे विशेष सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यात रक्तदान करणाऱ्यांसाठी ५०हजाराचा अपघात विमा, रक्तदान करणाऱ्यास स्वतः रक्ताची आवश्यकता पडल्यास जीवनभर मोफत रक्तदान करणाऱ्यांच्या कुटुंबात कोणालाही रक्ताची गरज असल्यास ५०%सुट तसेच डोनर कार्डवर ३००रुपयांची सवलत अशा प्रकारे या ठिकाणी रक्तदात्यांनसाठी सवलती देण्यात येणार आहेत अशा या स्तुत्य उपक्रमास जास्तीत जास्त सहकार्य करावे असे आवाहन आदर्श गणेश मित्र मंडळ व रेड प्लस ब्लड बँक यांच्या तर्फे डॉ.भरत गायकवाड व अमोल शेलार यांनी केले आहे
रक्तदानाचे फायदे
रक्ताची तपासणी होते (एच.आय.व्ही., गुप्त रोग, कावीळ-ब, क प्रकारची, मलेरिया) वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते. .रक्तगट व हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते. बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते. नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते. नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय-यकृतासारखे अवयव निरोगी राहतात. एक रक्तदाता तिन लोकांचे प्राण वाचवू शकतो.