Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वृद्धाने संपविली जीवनयात्रा
    क्राईम

    वृद्धाने संपविली जीवनयात्रा

    editor deskBy editor deskSeptember 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील एका वृद्धाने दापोरा – शिरसोली रेल्वे गेटजवळ आज दि १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली या वृद्धाने स्वतला झोकून देत आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे की, शहरातील सालार नगर जवळील हाजी अहमद नगरातील रहिवासी शेख इरफान शेख याकुब मनियार (वय ४५) यांचा सराफ बाजारातील भवानी माता मंदीराजवळ दुकान लावू बांगडयांचा व्यवसाय करून पत्नी व दोन मुलांचा उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी रूखसानाबी या मुजाहिद व जयद या दोन मुलांसह नंदूरबार माहेरी कामानिमित्त दोन दिवसांपासून गेलेल्या होत्या. त्यामुळे शेख इरफान हे घरी एकटेच होते.

    गुरुवार १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता ते दुचाकीने शिरसोली येथील मोठी बहिण मलेकाबी यांच्याकडे गेले. शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ त्यांनी दुचाकी लावून धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे सकाळी ९ वाजता उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.