जळगाव;- जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – ०१, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-००, अमळनेर-००, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-०१, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण २ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४२ हजार ६९२ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार ०९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २३ रुग्ण सध्या उपचार घेताय.