जळगाव : प्रतिनिधी
शहरातील डी मार्ट ते इच्छादेवी चौक रस्त्याच्या कामाची सुरुवात करून जबाबदारी निश्चित करणेबाबत आज राष्ट्रवादीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील एक महिन्यापासुन डी मार्ट ते इच्छादेवी चौक या रस्त्याच्या दुर्दशेबाबत राष्ट्रवादीतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी पोलिस प्रशासनातर्फे आश्वासित करण्यात आले होते कि, संबंधितांशी सविस्तर बोलून रस्त्याचे काम करण्याबाबत निर्णय घेऊ. गेल्या १५ दिवसांपुर्वी महानगरपालिकेने रस्त्याचे कामाबाबत अंदाजपत्रक सादर करुन निविदा प्रक्रियाही राबविण्याचे निश्चीत झाले होते. परंतू सदरील रस्त्याबाबत निर्णय होत नाहीय. सदर रस्ता जळगाव शहर महानगर पालिकेने राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणतेय की, काही बाबतीत पुर्तता व समाधान न झाल्याने आमच्याकडे वर्ग झाला नसल्याने म.न.पा. नेच त्या रस्त्याचे काम पूर्ण करावे व म.न.पा. निधीतून काम करावे, असे निश्चित केल्याचे कळते.
अशा या अंतर्गत वादाने त्या रस्त्यावरील अतिक्रमण वाढून अपघातामध्ये वाढ झाल्याचे दिसून येतेय. याकरीता या रस्त्याबाबतची जबाबदारी निश्चित करुन रस्त्याचे काम पुर्णत्वास सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा व नागरिकांना सुविधा द्याव्या. तसेच सर्व संबंधित विभागाची बैठक बोलवून राष्ट्रवादी पार्टीच्या पदाधिकारी यांनाही सदर बैठकीस उपस्थित राहण्याची परवानगी दिल्यास आमचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादीकडून जळगाव जिल्हाधिकारी राऊत यांना देताना महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, वाल्मिक पाटील, इब्राहीम तडवी, राजू मोरे, अखिल पवार, भगवान सोनवणे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.