जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रेशन दुकानातील ई पॉज मशीन सर्वर डाऊन मुळे बंद असून यामुळे रेशनवरील धान्याचा पुरवठा गेल्या पंधरा दिवसापासून बंद झाला आहेत. शिधापत्रिका धारकांचे अन्नधान्य हे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध असतांना मात्र ई-पॉज मशीन अभावी लाभार्थ्यांनाही वंचित राहावे लागत असून त्यामुळे रेशन दुकानदारांना लाभार्थ्यांमध्ये खटके उडत आहेत. त्यामुळे इ पाँज मशिन तांत्रिक बिगाड़ तातडीने दुरुस्त करून धान्य पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर शिधापत्रिका लाभार्थ्यासह जोरदार निदर्शने करण्यात आली त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सुनिल सुर्यवंशी सो. यांना निवेदन देऊन खालील मागण्या करण्यात आल्या. सार्वजनिक वितरण व्यवस्थेने राज्यात रेशन दुकानातून धान्य वितरणासाठी ई- पॉज या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर केला जातो धान्य वितरणात पारदर्शक येण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जात असला तरी अनेकदा सर्ववर डाऊन मुळे रेशन धान्य दुकानात उपलब्ध असूनही लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे सततच्या या समस्येवर गोरगरीब शिधापत्रिक धारक त्रस्त झाले आहेत, तर
महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धान्य घेणारी रेशन दुकानावर लाभार्थ्याचे गर्दी होत असते. परंतु नेटवर्क नसल्याने धान्य वितरणाचे कामच ठप्प झाल्याने वादा -वादीचे प्रसंगी निर्माण होत आहेत. ई- पॉज मशिन चा वापर सुरू झाला तेव्हा टू-जी इंटरनेट वापरले जात होते. त्यामुळे ई-पॉज मशीन मध्ये यंत्रणाचा वापर केला होता २०२० पर्यंत या मशीन व्यवस्थित सुरू होत्या, मात्र आता फोर-जी यंत्राचा वापर सुरू झाला असून लवकरच फाईव्ह जी चा वापर देखील केला जाणार आहे. त्यामुळे दुकानदाराकडे असलेला ही ई-पॉज मशीन मध्ये नवीन सॉफ्टवेअर अपडेट करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने केले आहे. तसेच गेल्या पंधरा दिवसापासून धान्य वितरण व्यवस्था बंद असून येत्या काही दिवसात सणासुदीचे दिवस येत आहेत. या दृष्टिकोनातून शिधापत्रिका धारकाना धान्य घेण्या कामी शासनाने मुदत वाढून देण्याची मागणी ही अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे. रेशन दुकानांमधील ई -पॉज मशीन मध्ये वारंवार बिघाड होणे, हाताचे ठसे न उमटणे, नेटवर्क न येणे, ई -पॉज मशिन बंद पडणे या अडचणीमुळे स्वस्त धान्यसाठी कष्टकरी, कामगार,मजूर, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, धुर्णीभांडी करणाऱ्या महिला, गवंडी काम करणारे कामगार, यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी शासनाने या गोष्टीचे गांभीर्य पाहून त्वरित इ- पॉज मशीन संदर्भात भूमिका घेऊन गोरगरीब लाभार्थी धान्य न घेता घरी परतणार नाही याची दक्षता घेऊन मा. सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असून प्रशासनाने न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घेऊन लाभार्थ्याना ई पॉज तांत्रिक अडचणीने बंद असल्यास स्वस्त धान्य दुकानदारांना शिधा पत्रिका धारकांना ऑफ लाईन वाटप करण्याची मुभा द्यावी. अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, सागर सपकाळे, संदीप तायडे, किरण अडकमोल, नागराज ढिवरे, गुलाल बाविस्कर, सुभाष पाटील, कादर शहा, नरेंद्र मोरे, आकाश पानपाटील, संतोष कोळी, अशोक वानखेडे, रतन भोसले, शबाना खाटीक, नजमा शेख, जरीना पठाण, कादर शेख, नफिसाअली, जायदा खान, रईसा शेख यांच्यासह कार्यकर्ते व शिधा पत्रिका धारक उपस्थित होते.