जळगाव ;- डॉ. निलेश गोविंद किनगे इंटरवेंशनल न्यूरॉलॉजिस्ट ऍक्सऑन ब्रेन हॉस्पिटल हे जळगावातील सुप्रसिध्द मेंदूरोग तज्ञ असून त्यांच्या रुग्णालयात दिनांक १४ रोजी पाचोरा येथील वनराज समाधान भोई वय -38 वर्षे यांना अचानक पने डोकेदुखी आणि चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले . त्यामुळे तात्काळ त्यांना डॉक्टर निलेश किनगे यांच्या रुग्णालयात आणण्यात आले .
यांनी तात्काळ रुग्णाचा सि.टी. स्कॅन करण्यास सांगितले . सि.टी. स्कॅन केल्यानंतर रुग्णाच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झालेला दिसून आला . त्यानुसार रुग्णाला रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले त्यानंतर यांनी रुग्णाच्या मेंदूची अँजिओग्राफी केली असता त्यामध्ये रुग्णाच्या मेंदूमध्ये व्हाइडनेक अनुरीझम आढळला त्यातून रक्तस्त्राव होऊन रुग्णाला लकवा झाला .
डॉक्टर निलेश गोविंद किनगे यांनी रुग्णाच्या मेंदूमधील धमनी फुग्याच्या आकारानुसार फ्लोडायव्हर्टर पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला . , त्यानुसार शस्त्रक्रिया दिनांक १७ रोजी यशस्वी रित्या पूर्ण केली . तरी रुग्णाची स्थिती व्यवस्थित असून रुग्णाला भविष्यात होणारा जीवाचा धोका पुर्णपणे नाहीसा झाला आहे .
ही प्रणाली प्रथमच खान्देशात यशस्वी झाली आहे . ह्या शास्त्रक्रियेसाठी रुग्णांना मुंबई पुणे अशा ठिकाणी जावे लागायचे तरी , ही प्रणाली डॉक्टर निलेश गोविंद किंनगे अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केली आहे . तरी रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे मनापासुन आभार व्यक्त केले .