वरणगाव : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील हतनूर गावाच्या तापी नदीच्या पुलावरून पाण्यात उडी मारुण आयुध निर्माणी वसहात मध्ये राहणाऱ्या एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.
आयुध निर्माणी वसाहतीतील रहिवाशी अतूल सतिष वाणी ( ३२ ) रा क्वॉ न १७६ ए ( मोडीफाईड ) हे आपल्या परिवारा सोबत राहत असून बहीण प्रिया सतिष वाणी ( ३२ ) ही यांच्या सोबत राहत होती. दि २१ रविवार रोजी सकळी नऊ वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना घरातून निघुन हतनूर गावा जवळील तापी नदीच्या पुलावर जाऊन पाण्यात उडी घेतली. येथे उपस्थीत असलेल्या नागरिकाच्या लक्षात आल्याने महिलेस वाचविण्यासाठी प्रयत्न करीत तीला पाण्या बाहेर काढले. मात्र तोवर उशीर झाला होता.
मयत महिला हि घटस्फोटीत होती व ती भावा कडेच राहत होती घटस्पोट झाल्याने तीच्या मनावर परिणाम झाल्याने या पुर्वीही तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला हतनुर पोलीस पाटील वासुदेव इंगळे यांच्या खबरी वरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुड करीत आहे.