राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी घेतला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय करता वैद्यकिय शिक्षण विभागासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात महाविद्यालये उभारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंटकडून चार हजार कोटींचं कर्ज दिलं जात आहे. या कामांना लवकरच सुरुवात होईल. केंद्र सरकारकडूनही निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासन गिरीष महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली आहे. मागिल पाच वर्षात एकाही मेडीकल कॉलेजला परवानगी दिली नाही. परंतु, खासगीपेक्षा सरकारी मेडिकल कॉलेजचा नागरिकांना फायदा होईल. महाराष्ट्रात गडचिरोली, वाशिम, हिंगोली, बुलडाणा, भंडारा, पालघर, ठाणे, अहमदनगर, अमरावती, जालना, मुंबई उपनगर आणि वर्धा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत, असंही महाजन म्हणाले.