धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील आज ‘शिव संवाद’ यात्रेच्या निमित्त शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंचे गावात लावलेले बॅनर फाडणाऱ्याविरुद्ध शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे.
गुलाबराव वाघ यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आज दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १ वाजता युवा सेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रा कार्यक्रम असल्याने सदर कार्यक्रमानिम्मीत्ताने शहरात ठिक ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे. सदर बँनवर माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे तसेच कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात आले होते. धरणगाव-एरंडोल रोडावरील गणेश नगर स्टॉप येथे लावण्यात आलेले आमदार आदित्य ठाकरे यांचे शिवसंवाद यात्रेचे बॅनर दिनांक २० ऑगस्ट रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास शिवसेना विरोधकांनी नेत्यांचे बॅनर फाडून एक प्रकारे शिवसैनिकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. दोन विचारसारणीच्या लोकांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणा-या समाज कंठकाविरुध्द तसेच त्याला मदत करणा-या प्रवृत्तीचा शोध होवुन त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही श्री. वाघ यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आज प्रत्यक्ष सभेच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अतिरीक्त पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी दिली आहे.