महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्याने ज्येष्ठ नागरिकांनसाठी हा निर्णय घेण्यात आला.
आज या मंत्रिमंडळाची बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकीच एक निर्णय म्हणजे पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास करता येणार आहे. तसेच राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांचा तीन टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्याबसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.
राज्यातील नव्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.,दहीहंडी पथकातील गोविंदाला 10 लाखांचे विमा संरक्षण गोविंदा पथकांची शासनाने विमा कवच द्यावा अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरणेत येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले.