नेहमीच वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत असणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकतेच व्याख्यानात आणखी काही वादग्रस्त विधानं केली होती. त्यावरून पोंक्षेंवर सर्वच स्थरातून टीका केली जात आहे. आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही टीका आज केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले कि, शरद पोंक्षेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शरद पोंक्षेंसारखे लोक अशी वादग्रस्त वक्तव्य फक्त प्रसिद्धी साठी करतात. “जो व्यक्ती राज्यभर नथुराम गोडसेच्या नाटकाचे प्रयोग करत फिरत असेल.तो हिंदूंना नपुंसक म्हणत असेल तरतो व्यक्ती मुळातच हिंसक असणार यात काही वाद नाही. हिंदू धर्म हा सहिष्णू धर्म आहे. हिंदू धर्माने सर्व जातींतील लोकांना सामंत देण्याचं काम केलं आहे.
अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे पण धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेणे हा त्यापेक्षा मोठा धर्म आहे. तो हिंदूंना नपुंसक म्हणत असेल तर माझी सर्व हिंदूत्ववादी संघटनांना व सत्तेत बसलेले मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती आहे कि, हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या पोंक्षेंविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा. सहनशीलता संपली आता रागही नाही आणि चीड येत नाही.