माजी आमदार आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने पुन्हा एकदा नवीन धक्कादायक घटना घडलीय. महाराष्ट्रातील कामगीरी करणारा साहसी नेता गमावल्याने नव्या सरकार नाराज झाले आहेत. विनायक मेटेच्या गाडीला अपघात लवकर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं माहिती समोर आहे.
विनायक मेटेच्या गाडीच्या अपघात झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. चालकाने ही लवकर मदत न मिळाल्याचं माहिती दिली. एक्सप्रेस वे वर एअर एम्ब्युलन्सची सुविधा लवकरच उपलब्ध आशक्यता आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे यंत्रणेची देखील कसून चौकशी केली जाणार आहे.मंत्री मंडळात देखील चर्चा झाली. राज्य सरकार लवकर या घटनेनंतर महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हायवेवर सीसीटिव्ही कॅमेरा मॉनिटरिंग नव्हती का? यंत्रणा काय करत होती? विनायक मेटेंना तात्काळ मदत का मिळाली नाही? मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे यंत्रणेवरील क्युक रिसपॉन्स टीम काय करत होती? असे प्रश्न मंत्रिमंडळात उपस्थित करण्यात आले.आमदारांना सतत प्रवास करावा लागतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. प्रवासादरम्यान आमदारांच्या सुरक्षितते बाबत सरकारने विचार करण्याची गरज आहे. तसेच मंत्र्यांची जबाबदारी सरकारवर देखील आहे.