Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकी पार्किंगच्या वादातून थेट गोळीबार? शिवाजीनगरात टोळक्याचा धुमाकूळ, ३ अटकेत !
    क्राईम

    दुचाकी पार्किंगच्या वादातून थेट गोळीबार? शिवाजीनगरात टोळक्याचा धुमाकूळ, ३ अटकेत !

    editor deskBy editor deskNovember 19, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    माझा बाप किंगमेकर आहे, थोड्या वेळात तुझ्या घरी येवून तुझा मर्डर करतो. अशी फोनवर धमकी दिल्यानंतर काही वेळताच पाच ते सहा जणांचे टोळके हातात तलवारी आणि कट्टा घेवून शिवाजी नगरात पोहचले. त्यांनी केयूर कैलास पंधारे याच्या घराच्या दिशेने त्याच्या आईला जीवेठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याची घटना दि. १७ रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन संशयितांना शहर पोलिसांनी असोदा गावाजवळून अटक केली असून दोघांचा शोध सुरु आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शिवाजी नगरात राहणारा केयूर पंधारे याचा मित्र शशांक व कौशिक शर्मा यांच्या मावशी सिमा शर्मा यांच्या घरासमोर प्रेम पाटील दुचाकी लावतांना झाडू मारणाऱ्या सीमा शर्मा यांच्यासोबत दि. १६ रोजी वाद झाला होता. यावेळी प्रेम पाटील याने दोघ मायलेकींना मारहाण केल्यामुळे केयूर पंधारे हा त्याठिकाणी गेला होता. केयूर हा दोघ मायलेकींना तक्रार देण्याकरीता पोलिसात घेवून गेल्यामुळे तो त्यांना सहकार्य करत असल्याचा राग प्रेम पाटील व त्याच्या मित्रांच्या मनात होता. दरम्यान, दि. १७ रोजी सायंकाळी केवूर हा पिझ्झा घेण्याकरीता गेलेला असतांना त्याची आई घराच्या गॅलरीमध्ये उभी होती. त्यावेळी दुचाकीवरुन पाच ते सहा इसम हे हातात तलवारी आणि कट्टा घेवून त्यांच्या घरासमोरील चौकात आले.

    केयूर पंधारे याने घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर त्याची आई सुरेखा पंधारे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार भूवनेश बाविस्कर, पंढरी सपकाळे, भैय्या सोनवणे वाच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी संशयितांच्या शोधार्थ गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सुनिल पाटील, सतिष पाटील, दीपक शिरसाठ, भगवान पाटील, नंदलाल पाटील, योगेश पाटील, अमोल ठाकूर, प्रणय पवार, राहुल पांचाळ यांचे पथक रवाना केले. या पथकाने तपासचक्रे फिरवित पंढरी बाबुलाल कोळी (वय ३५, रा. वाल्मिक मंदिराजवळ, जैनाबाद), जितेश मगण सपकाळे (वय ३८, आवार), हर्षल जितेंद्र कदम (वय २८, रा. श्रीराम नगर, वांजोळा रोड, भुसावळ, ह.मु. ए विंग, रुम नं.५०३ मकरा टॉवर जळगाव) या संशयितांना असोदा शिवारातून अटक केली.

    घटनेची माहिती केयूरच्या आईने त्याला दिल्यानंतर काहीवेळातच केयूर हा घरी आला. त्याने आईला सांगितले की, थोड्यावेळापुर्वी संशयित भुवनेश बाविस्कर याने त्याला फोन करुन तू दादा झाला आहे का, घरी येवून तुझा मर्डर करतो अशी धमकी दिली होती. त्यानंतर काही वेळताच टोळक्याने पंधारे यांच्या घरी येवून त्यांच्यावर गोळीबार केल्यामुळे खळबळ माजून गेली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रत्ना अपार्टमेंटमध्ये कौटुंबिक वादाचा भडका : विवाहितेला ढकलून घराबाहेर काढले; जेठाविरुद्ध गुन्हा

    November 19, 2026

    डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे : एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्याचा मृत्यू !

    November 19, 2026

    मृत महिलांच्या नावाने बनावट कागदपत्रे? मेहरुणमधील जमीन हडप प्रकरणी ६ जणांवर गुन्हा!

    November 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.