Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जेवणाच्या वादातून मुलाने केली आईची हत्या : बोदवड तालुक्यात खळबळ !
    क्राईम

    जेवणाच्या वादातून मुलाने केली आईची हत्या : बोदवड तालुक्यात खळबळ !

    editor deskBy editor deskOctober 26, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जेवण बनवून न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मुलाने आईवर हल्ला करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बोदवड तालुक्यातील येवती येथे उघडकीस आला आहे. अलकाबाई पुरुषोत्तम वाघ (वय अंदाजे ६३) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांचा मुलगा गणेश पुरुषोत्तम वाघ याच्याविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार, २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ही घटना समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली.

    पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, अलकाबाई वाघ या येवती येथे मुलगा गणेश याच्यासोबत राहत होत्या. त्यांचे पती पुरुषोत्तम वाघ यांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. गणेश याच्या दोन्ही पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याची माहितीही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणातील फिर्यादी आकाश रविंद्र महाजन (वय २४) हे अलकाबाई यांचे नातू आहेत. ते जामनेर तालुक्यातील पाटखेडा येथे मेव्हण्याकडे राहून मजुरी करतात. २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.०५ वाजता त्यांचा भाऊ अनिकेत याने फोन करून आजीची हत्या झाल्याची माहिती दिली. त्यानंतर आकाश महाजन हे मेव्हणे धर्मराज शशिकांत पाटील यांच्यासोबत येवती येथे पोहोचले.

    पहाटे ५.३० वाजता घरी पोहोचल्यावर घरासमोर नागरिकांची गर्दी होती. घरात अलकाबाई रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्यांच्या अंगावर गोधडी टाकलेली होती, तर जवळच गणेश वाघ हातात खुरपे घेऊन बसलेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग असलेली फुटलेली लोणच्याची बरणी आणि शेतीकामासाठी वापरले जाणारे लोखंडी अवजारही आढळल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. आकाश महाजन यांनी गणेश वाघ याला घटनेबाबत विचारणा केली असता, जेवण बनवून न दिल्याच्या रागातून आईच्या डोक्यात लोणच्याची बरणी मारून खुरप्याने वार केल्याचे त्याने सांगितल्याचा दावा तक्रारीत आहे. यानंतर आकाश महाजन यांनी बोदवड पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास बोदवड पोलीस करीत असून, घटनेची नेमकी पार्श्वभूमी तपासातून स्पष्ट होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश : मुक्ताईनगर बस आगाराला मिळाल्या चार बसेस !

    October 26, 2026

    मुक्ताईनगर बस आगारात आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्साहात!

    October 26, 2026

    क्रेन कोसळून चालकाचा मृत्यू; ठेकेदारासह दुसऱ्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल

    October 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.