एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत बंड केला आहे. एकनाथ शिंदेसह 55 पैकी 40 आमदार , खासदार यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. आमदारांच्या या पाठिंब्यामुळे तर राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पडलं. राजकारणात सत्ता संघर्ष सुरू असताना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहे.
राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांचा गद्दार म्हणून वारंवार उल्लेख करत आहेत. याच्या दोन महिन्यांनी शिंदे आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 21 ऑगस्टला नवी मुंबईमध्ये बालाजी मंदिराच्या भुमीपुजनाचं निमंत्रण मंदिराच्या विश्वस्तांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाकरे कुटुंबालाही दिलं आहे.
नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिराच्या भुमीपूजनाला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र उपस्थित राहण्याची शक्यता आहे. देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी 5 ऑगस्टला शिंदे, फडणवीस आणि ठाकरे यांची भेट घेतली.समितीचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांना फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेटले आणि त्यांचा सत्कार केला, तसंच त्यांना भुमीपुजनाच्या कार्यक्रमाचं आमंत्रणही दिलं.