Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » किराणा मालासोबत प्रतिबंधित तंबाखूचा साठा : चाळीसगावात अन्न प्रशासनाची कारवाई !
    क्राईम

    किराणा मालासोबत प्रतिबंधित तंबाखूचा साठा : चाळीसगावात अन्न प्रशासनाची कारवाई !

    editor deskBy editor deskSeptember 18, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड परिसरातील विनोद किराणा स्टोअर्सवर कारवाई करून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा ६८ हजार १८ रुपयांचा साठा जप्त केला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या फिर्यादीवरून नचिकेत सुनील येवले (वय २२, रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार १७ सप्टेंबरला हिरापूर रोडवरील मे. विनोद किराणा स्टोअर्स येथे तपासणी करण्यात आली. या वेळी पंच व चाळीसगाव शहर पोलिसांच्या उपस्थितीत दुकानाची झडती घेतली असता किराणा मालासोबत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्रीसाठी साठवल्याचे आढळले. पथकाने विविध १३ प्रकारच्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा ताब्यात घेतला. त्यातील प्रातिनिधिक नमुना विश्लेषणासाठी घेतले असून उर्वरित साठा पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दुकानाचे संचालक विनोद सुदाम वाणी (वय ५१) असल्याचे तपासात समोर आले. साठा कोठून आणला, याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. राज्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्रीच्या उद्देशाने साठवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गोरे होण्याच्या नादात स्वतःवरच उपचार; शिकाऊ डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू!

    September 18, 2026

    ‘२० लाख द्या, दुप्पट परत मिळतील’ म्हणत फसवणूक!

    September 18, 2026

    भावाच्या निधनाचा धक्का अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल!

    September 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.