बंडखोर ४० आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत गद्दारी केल्याचा आरोप करत, त्या ४० आमदारांनी राजीनामा देवून पुन्हा निवडून येवून दाखवावं असं खुलं आव्हान आदित्य यांनी दिलं आहे. ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिउत्तर देताना आमदार शहाजी पाटील यांनी आदित्य ठाकरेना चांगले खडसावले आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा ईडीने अटक केली. पत्राचाळ घोटळाप्रकरणी ईडी सध्या राऊतांची चौकशी करत आहे. शहाजी बापू पाटील यांनी राऊतांचा समाचार घेतला. राऊत म्हणजे भोंगा नाही, तर राज्याला लागलेली किरकिर होती, असा टोला त्यांनी लगावला आहे. यासोबतच त्यांनी आदित्य ठाकरेंनाही सल्ला दिला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जात शिवसैनिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
ते बंडखोर आमदारांवर सडकून टीकाही करत आहेत. यादरम्यान पाटील यांनी आदित्य ठाकरेंना एक सल्ला दिला आहे. ठाकरे यांच्या आव्हानाला उत्तर देत, आमदार शहाजी पाटील यांनी प्रतिआव्हान दिले आहे. “आधी तु्म्ही राजीनामा देऊन पुन्हा निवडून येवून दाखवा, असे खुले आव्हान शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे. आम्ही राजीनामे देणार नाही. तुम्हीच पंधरा सोळा जण उरलेले आहात. आदित्य ठाकरे यांच्यासह उर्वरित आमदारांनी राजीनामे द्यावेत. तुमची आमदारकी शाबूत ठेवणार आणि आमच्या मागे लागणार का असा सवालही आमदार पाटील यांनी उध्दव व आदित्य ठाकरे यांना उद्देश यांना उद्देशून केला. कायद्याची पुस्तकं वाचा जरा असा सल्लाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.