भाजप-शिवसेनेचे हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी कार्यरत आहे. आता केंद्र सरकारचाही पूर्ण पाठिंबा असल्याने राज्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
रविवारी पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्री म्हणाले, आता विकासाची कामे फायलींमध्ये अडकणार नाहीत. त्यामुळे राज्याच्या विकास कामाला गती येईल. जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता. अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचा विषय असेल किंवा नसेल, पण चर्चा करून मार्ग काढू, असे सांगूनही युती करण्याची इच्छाशक्ती दिसत नव्हती. अडीच वर्षांत राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला जाणारा निधी, शिवसैनिकांचे झालेले खच्चीकरणला वाचा फोडण्यासाठी वेगळा निर्णय घ्यावा लागल्याचे शिंदे म्हणाले.
राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारे रस्ते, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत.जिल्ह्यातील दळणवळण सुयोग्य राहण्यासाठी रस्त्यांची परिस्थिती सुधारावी. नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेताना नवीन कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील, याचीही दक्षता घ्यावी. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्यासाठी तातडीने आवश्यक ते प्रस्ताव सादर करावेत. जळगाव येथील केळी संशोधन प्रकल्प, धुळे येथील औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण, नंदूरबार जिल्ह्यातील वीज वितरण उपकेंद् आहे. अहमदनगर येथील संरक्षण दलाच्या जागेच्या भूसंपादबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.