Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्राध्यापक होण्याची मोठी संधी! राज्यात ५,०१२ रिक्त पदांची भरती; नियमावली जाहीर
    जळगाव

    प्राध्यापक होण्याची मोठी संधी! राज्यात ५,०१२ रिक्त पदांची भरती; नियमावली जाहीर

    editor deskBy editor deskSeptember 3, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव | प्रतिनिधी 

    राज्य सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्नित अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील ५,०१२ रिक्त पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून, भरती प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे सूचना जारी केल्या आहेत असे उच्च शिक्षण जळगाव विभागाचे सहसंचालक डॉ. पराग मसराम यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

    नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर जाहिरातीचा मसुदा संबंधित विद्यापीठाच्या मान्यतेसाठी सादर करणे, जाहिरातीत शैक्षणिक पात्रता व सामाजिक आणि समांतर आरक्षणाची अचूक माहिती नमूद करणे बंधनकारक आहे. विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध करता येणार असून, राष्ट्रीय व राज्यस्तरीय वृत्तपत्रात जाहिरात देण्याच्या सूचना आहेत.

    उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारणे बंधनकारक असून, ऑफलाइन अर्जांचीही तरतूद करण्यात आली आहे. शॉर्टलिस्टिंगसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेले निकष वापरणे, शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी व गुणांकनाचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

    मुलाखतीचे संपूर्ण CCTV रेकॉर्डिंग करून ते किमान एक वर्ष सुरक्षित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवड समितीची रचना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचना व शासन निर्णयानुसार करावी लागणार असून, विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतर अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

    “सहाय्यक प्राध्यापक पदभरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, नियमानुसार आणि उमेदवारांच्या दृष्टीने विश्वासार्ह व्हावी, हा शासनाच्या नव्या सूचनांचा मुख्य उद्देश आहे,” असेही सहसंचालक डॉ. मसराम यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ज्याला लेकरासारखं प्रेम दिलं, त्याच भाच्याने मावशीचा जीव घेतला! ४० दिवसांनी समोर आलं काळीज पिळवटणारं सत्य”

    September 13, 2026

    समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम; परिसरात कायमस्वरूपी CCTV कॅमेऱ्यांची सुविधा!

    September 13, 2026

    रूपाली महाजन यांनी घेतला पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा आशीर्वाद; शहर विकासासाठी दिला महत्त्वाचा सल्ला !

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.