शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापा टाकला. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.
काही महिन्यांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात ईडीने राऊत यांना समन्स बजावले होते. रविवारी चौकशीनंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेतले आहे. सलग 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊतांची काल सकाळपासून चौकशी सुरु होती. संजय राऊत यांच्या घरातून 11.50 लाखांची कॅश सापडली आहे. ED ने छापेमारीदरम्यान ही कॅश जप्त केली आहे.
या प्रकरणात ईडी संजय राऊत यांना प्रश्न विचारणार असल्याचं समोर आलं आहे. इतकी कॅश घरात का ठेवण्यात आली, यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे पथक आले होते, अशी देखील माहिती समोर आली होती. ईडी अधिकाऱ्यांची तीन पथकं संजय राऊतांविरोधात तपास करत होते. शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. राऊत यांच्यावर कारवाई सुरू झाल्यापासून शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.