Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘त्या’ घरात गांजा असल्याची खबर; पोलीस निरीक्षक मनेळ यांनी रचला सापळा!
    जळगाव

    ‘त्या’ घरात गांजा असल्याची खबर; पोलीस निरीक्षक मनेळ यांनी रचला सापळा!

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 26, 2026Updated:August 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव (प्रतिनिधी) :
    चाळीसगाव शहरातील डोंगरी नदीकाठी चामुंडा माता मंदिराजवळ पोलिसांनी कारवाई करत तब्बल १८ किलो ६८६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ९ लाख ३४ हजार ३०० रुपये किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला असून, एका ४५ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली आहे.

    चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना २५ ऑगस्ट रोजी गोपनीय माहिती मिळाली होती. डोंगरी नदीच्या काठी राहणाऱ्या एका व्यक्तीने विक्रीच्या उद्देशाने घरात गांजाचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार केले.

    विशेष पथकाने रात्री सुमारे १०.१० वाजता संबंधित घराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून झडती घेतली. यावेळी लोखंडी पलंगाखाली ठेवलेल्या दोन पिशव्यांमध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून हा मुद्देमाल जप्त केला.

    या प्रकरणी भूषण केशव पवार (वय ४५, रा. डोंगरी नदीकाठ, चामुंडा माता मंदिराजवळ, चाळीसगाव) याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०२/२०२६ नोंद करण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला तपासासाठी अटक करण्यात आली आहे.

    ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस पथकाकडून सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ज्याला लेकरासारखं प्रेम दिलं, त्याच भाच्याने मावशीचा जीव घेतला! ४० दिवसांनी समोर आलं काळीज पिळवटणारं सत्य”

    September 13, 2026

    समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम; परिसरात कायमस्वरूपी CCTV कॅमेऱ्यांची सुविधा!

    September 13, 2026

    रूपाली महाजन यांनी घेतला पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा आशीर्वाद; शहर विकासासाठी दिला महत्त्वाचा सल्ला !

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.